मान्सून राजा घेणार विश्रांती..

मान्सून राजा घेणार विश्रांती..

गेले काही दिवस बरसल्यानंतर पुढचे ५ दिवस मान्सूनराजा विश्रांती घेणार आहे.  त्यामुळं मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्याच्या कपाळावर चिंतेचे ढग दिसू लागलेत. 

आधीच मराठवाडा, खान्देश आणि विदर्भात पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळं दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. मान्सूनचा अक्ष बदलल्यानं महाराष्ट्रातला मान्सून उत्तर भारतात सरकलाय, त्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. तर मुंबई आणि नवी मुंबईतही पावसाचा अंदाज आहे.
 

राज्यात दरड कोसळण्याचं आणि रस्ते खचण्याचं सत्र सुरूच आहे. नाशिक पुणे महामार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात ही दरड कोसळली. महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. 

चंदनापुरी घाटात आठ दिवसात तिसऱ्यांदा ही दरड कोसळीय. त्यामुळे चंदनापुरी घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरतोय. चंदनापुरी घाटातील कोसळणार्या दरड काढण्याची गरज आहे. अन्यथा या मार्गावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिकमधील वैतरणा वीज केद्रांवर देखील दरड कोसळलीय. पावसाचा जोर वाढल्यानं पाणी वीज केद्रांत शिरलयं. त्यामुळं हे वीज केंद्र पुढच्या ३ महिन्यांसाठी बंद राहणार आहे.

WebTitle : marathi news maharashtra monsoon to take pause and incidents of landslides reported in Maharashtra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com